भाषा शिक्षण कशासाठी?
भाषेची गोष्ट ‘अति परिचयात् . . .’ अशी आहे. एक तरी भाषा प्रत्येकाला अवगत असते. म्हणून तिच्याबद्दल कोणी स्वतंत्रपणे विचारच करत नाही. भाषा ही गोष्ट आपल्या अवयवांसारखी आपण गृहीत धरतो. आपल्याला हात असतात, पाय असतात, तशी आपली एक भाषा असते. भाषाक्षमता उपजत असते, पण भाषा उपजत नसते. पहिली भाषा माणूस सहज शिकतो, इतकी सहज, की …